अनुभव

श्री आशिष
मी एका मार्केट रिसर्च कंपनीत डाटा प्रोसेसिंग एनालिस्ट म्हणून काम करतो जी अमेरिका आणि इंग्लंडस्थित व्यावसाईकांसाठी काम करते. मी आपणाबरोबर श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांनी स्वहस्ते तयार केलेल्या यंत्राबद्दलचा अनुभव सांगणार आहे. हे यंत्र श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराज प्रत्येक माणसाला वेगळे व त्या व्यक्तीच्या समस्यांप्रमाणे तयार करून देतात. ह्या यंत्रामुळे माझ्यामध्ये खूप सकारात्मक बदल झाला त्याच प्रमाणे माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी मला नेहमीच स्फूर्ती मिळाली आहे. असाध्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा फक्त आणि फक्त यांत्रांमुळेच मला साध्य झाल्या याबद्दल मी श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांचा शतशः आभारी आहे.
श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांनी अश्याच प्रकारे आमच्या सर्वांवर त्यांची कृपादृष्टी ठेवावी.

डॉ. मयुरेश
तीन वर्षांपूर्वी आम्ही स्वतःसाठी नविन घर शोधत होतो. आमची सर्वांची अशी इच्छा होती की नवीन घर त्याच सोसायटीत असावे, पण आर्थिक आणि व्यावहारिक दृष्ट्या ते शक्य नव्हते. त्या मुळे आंम्ही जवळपासच्या भागात घर शोधू लागलो. इतर ठिकाणी घर नक्की करण्या आधी आंम्ही श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांना विचारले की आंम्हाला ह्याच सोसायटीत घर मिळू शकेल का? आंम्ही थांबायला तयार आहोत. त्यांनी आंम्हाला आशिर्वाद दिला की तुंम्हाला इथेच सहा महिन्यांच्या आत घर मिळेल.
पण काय आश्चर्य फक्त दोन महिन्यांच्या आतच आंम्हाला आमच्या सोसायटीत कमी किमतीत दुसरे घर मिळाले. आजही आमचा यावर विश्वास बसत नाही. आमच्यासाठी हा एक मोठा चमत्कारच आहे.

श्री प्रसाद
मी प्रसाद , अमेरिकेतील इरिंगटन स्थित टेक्सास युनिवर्सीटीतून पी.एच.डी. झालो आहे. श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराज हे माझ्यासाठी एक आधारस्तंभ आहेत. त्यांनी नेहमीच माझ्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याच्या अडचणींमध्ये मला चांगला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा व उत्तेजन दिले आहे. त्यांचे तत्वज्ञान आणि सकारात्मक विचार व सकारात्मक दृष्टी मला निरंतर कार्यरत ठेवण्यास मदत करते. त्यांच्या शहाणपणाचे व मायेचे चार शब्द माझ्यात नेहमीच नवचैतन्य निर्माण करतात. त्यांनी अशाच प्रकारे आंम्हा सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी हीच त्यांच्याजवळ प्रार्थना. आपल्या पाठींब्याबद्दल आपले शतशः आभार.

डॉ. पराग
श्री विश्वचैतन्यशनैश्वरांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला तेंव्हा मिळाले जेंव्हा मी माझ्या करीयरच्या वाईट वळणावरून जात होतो. ज्या मुळे मला अतिशय उज्वल भविष्य आज प्राप्त झाले आहे. जेव्हा मी त्यांना माझ्या नोकरीच्या दोलायमान अवस्थेबद्दल सांगितले तेंव्हा महाराजांनी मला सांगितल्याप्रमाणे त्या प्रसंगातून सुखरूप बाहेर आणले. त्यांनी माझे आयुष्य योग्य दिशेला आनुल पुरते बदलून टाकले आहे. श्री विश्वचैतन्यशनैश्वरांनी नेहमीच आनंदी राहण्यासाठी व जीवन चैतन्याने भरण्यासाठी प्रेरित केले आहे.

कांचन
श्री विश्वचैतन्यशनैश्वरांनी नेहमीच आनंदी आणि निर्भय आयुष्य जगण्यासाठी प्रेरित केले आहे. श्री विश्वचैतन्यशनैश्वरांनी आम्हाला आमच्या आयुष्यात त्या वळणावर मदत केली आणि आंम्हाला एका प्रकाशमय वाटेवर घेऊन गेले जिथे आम्ही सर्व आशा सोडून दिली होती. मी एका मोठ्या अपघातातून शारीरिक आणि मानसिकरीत्या सावरले ते फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे. आम्हाला वाटणारी निर्भयता, विश्वास आणि सुरक्षेची भावना हा त्यांचा आशीर्वादच मानायला हवा. ते सदैव आमच्याच आसपास असतात हा होणारा भास आम्हाला एक कवच वाटतो. आम्ही सर्व स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की श्री विश्वचैतन्यशनैश्वरांनी आमच्यावर कायम कृपादृष्टी ठेवली आहे.

डॉ. धनंजय
सद्गुरू श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला एक नवीन योग्य दिशा मिळाली. सकारात्मक बदल घडून आले त्यामुळे काम करताना अधिक आनंद घेऊन काम केल्यामुळे कामात उत्साह टिकून यश मिळू लागले. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत प्राप्त झाला.

सुजीत
आई आणि सुरळीत चाललेली नोकरी या मधून एकाची निवड करणे ही माझ्यासाठी फार कठीण गोष्ट होती. कशाची निवड करावी ह्या बद्दल मनात साशंकता होती, त्याच वेळेस श्री विश्वचैतन्यशनैश्वरश्री स्वामींनी मला योग्य मार्ग दाखवला आणि मी नोकरी सोडली. आज मी खूप आनंदी आहे कारण मला माझ्या आईची सेवा करायची संधी मिळाली आणि आज मी अर्धवेळ नोकरी करून फ्रीलान्स काम करत आहे. माझ्यामते माझ्यात झालेला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मला संपूर्ण मनःशांती मिळाली ज्यामुळे मी जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो व आनंदी राहतो. ह्या मुळे माझे मझ्या घरच्यांशी, मित्रपरिवाराशी, नातेवाईकांशी असलेले संबंध सुधारले. श्री विश्वचैतन्यशनैश्वरांचा आशीर्वादामुळे माझ्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी मिळाली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

श्री निरंजन
ओम श्री विश्वचैतन्यशनैश्वराय नमः
मागील तीन वर्षांपासून मी श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांच्या संपर्कात आहे. आणि त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीपासूनच मला त्यांच्या अशीर्वादांच्या चमत्कारांचा प्रत्यय येऊ लागला. मी माझ्या वैवाहिक जीवनाच्या एका कठीण वळणावरून जात होतो, इतर बरेच उपाय केले पण काहीच उपयोग झाला नाही त्याच वेळेस माझा मित्र श्री पराग मला श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांकडे घेऊन गेला. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी लगेचच माझ्या प्रश्नावर उपाय सांगितला व तो अचूक लागु पडला.
माझ्या कंपनीने मला जर्मनीला पाठवण्याचा निर्णय घेतला त्या वेळेस श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांचा आशीर्वाद हा एकच महत्वाचा मुद्दा होता. जर्मनीच्या एक वर्षाच्या वास्तव्यामध्ये जेंव्हा जेंव्हा माझ्यावर कुठलेही संकट आले त्या प्रत्येक वेळेस महराजांच्या नामस्मरणाने माझ्यावरील संकट टळले त्याचे कारण महाराज मझ्या मागे ठाम पणे उभे असल्याचा आत्मविश्वास. आणि हे एकदा नाही तर अनेकवेळा मी अनुभवले आहे. या सर्वासाठी मी श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांचा आभारी आहे.

सौ वृषाली
श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांची आणि माझी भेट साधारणतः सात ते आठ वर्षांपूर्वी झाली. मला आई, वडील नाहीत पण महाराजच माझे आई व वडील आहेत. महाराजांची उपासना करायला लागल्यापासून छोटे मोठे कितीतरी चांगले अनुभव मला आले पण त्यातला सर्वात विस्मयकारी अनुभव म्हणजे आम्ही आमच्या घरासाठी गृहकर्ज काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. वेगवेगळ्या चार पाच बँकांमधून सहा महिने प्रयत्न करूनसुद्धा काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांच्या कानावर ही बाब घातल्यावर त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आणि काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी एक्सिस बँकेतून गृहकर्ज पास झाल्याचा फोन आला. त्या दिवसापासून अश्या विलक्षण अनुभवांची शिदोरी वाढतात चालली आहे.
महाराजांची प्रार्थना, त्रिकाल प्रार्थना नियमितपणे केल्यामुळे आपल्यामागे श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराजांच्या आशीर्वादित कवचाची एक अभेद्य भिंत उभी राहते आणि आपल्या सामान्य ईच्छा देखील सहज पूर्ण होतात.