शनी मार्गदर्शन

क्रिकेट विश्वाचा अनभिशिक्त सम्राट, देव, सूर्य अश्या अनेक विशेषणांनी ज्याचा आजपर्यंत गौरव केला गेला त्या सचिन तेंडुलकरांनी
निवृत्ती घेतली आणि त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रमही तितक्याच दिमाखात पार पडला. केंद्रशासनानेही त्यांना "भारतरत्न " प्रदान करून
क्रिकेट रसिकांचा आनंद द्विगुणीत केला. परंतु प्रत्येक कृतिमध्ये काहीतरी त्रुटी शोधण्याची काही लोकंमध्ये प्रवृत्ती असते.
त्यानुसारच त्यांनी सचिनच्या अगोदर कोणाकोणाला भारतरत्न मिळावयास हवे होते याचा उहापोह सुरु केला. ही चर्चा जरूर करावी
परंतु त्यात सचिनची तुलना कोणाबरोबर करणे व कोणाला लहान अथवा मोठे ठरवणे हे अत्यंत चुकीचे आहे कारण प्रत्येकाची
स्वतःची स्वतंत्र प्रतिमा आहे आणि त्यात दोघांची एकसारखी प्रतिमा कधीच नसते आणि म्हणूनच सचिनला दिलेले हे भारतरत्न
हे क्रीडा जगताचे महत्व अधोरेखित करणारे आहे असे आम्ही समजतो व त्यासाठी सचिनचे मनापासून अभिनंदन करतो.