अंतर्मन म्हणजे काय?

medium_mhanaje_kay.jpg जे आपल्याला नेहमीच योग्य सल्ला देते. जर एखादा गृहस्थ चोरी करीत असेल, कोणाला मारीत असेल किंवा कोणाबद्दल वाईट विचार करीत असेल तर त्याचे अंतर्मन नेहमीच हे करण्याला विरोध करते कारण चुकीच्या प्रत्येक कृतीला विरोध करण्याचा त्याचा निसर्गत:च स्वभाव आहे. परंतु तरीही माणूस वाईट वागतो कारण त्याला त्यात तत्कालीन फायदा आहे असे वाटते व त्याचा परिणाम म्हणून तो दीर्घकाळ दु:खात पडतो. कोणी असे म्हणेल की अंतर्मनाच्या सदाचाराचा उपदेश ऐकत राहिलो तर लोक माझा गैरफायदा घेतील. हा अत्यंत चुकीचा विचार आहे. हा दोष अंतर्मनाचा नसून आपला आहे. अंतर्मनाशी संवाद साधण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आपल्याला माहितीच नाही त्यामुळे अंतर्मनाच्या अमर्याद शक्तीचा आम्हाला उपयोग करता येत नाही.