सकारात्मक प्रार्थना म्हणजे काय

सकारात्मक प्रार्थना म्हणजे आपल्याला काय हवे आहे ते होकारात्मक (सकारात्मक) पद्धतीने मागायचे उदाहरणासाठी आपण हे वाक्य घेऊ - मला आजारपण देऊ नकोस - अशी प्रार्थना केली तर तुम्ही आजारी पडणार कारण विश्वमनाला म्हणजे परमेश्वराला नकोस हा शब्द कळत नाही. त्यामुळे मला आजारपण देऊ एवढेच समजते व आजारपण येते. कोणी असे म्हणेल की परमेश्वराला नको हा शब्द का कळत नाही? तर प्रथम आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की परमेश्वर सकारात्मक आहे. त्याला काय हवे आहे ते कळते. तो नकारात्मक नाही त्यामुळे त्याला नको कळत नाही. नाकारणे, काढून घेणे, नुकसान करणे याकरिता आपण सैतानाची कल्पना करतो. त्यासाठी देवाची गरज नाही. देव हा सांभाळणारा, रक्षण करणारा, इच्छा पुरविणारा असतो. त्याला आपण नको म्हटले की कळत नाही. जसे आपल्याला अंधार व उजेड यातील फरक कळतो म्हणून जर आपण सूर्याला म्हटले की तू उगवलास म्हणून अंधार गेला तर तो म्हणेल, अंधार काय असतो जरा मला आणून दाखवा. म्हणून प्रार्थना अशी हवी - मला चांगले आरोग्य द्या. समजा एखाद्याची नोकरी बदलली असेल तर त्याने "मला बदली नको" असे न म्हणता मला योग्य व सोयीचे ठिकाण द्या असे म्हटले पाहिजे.
अशीच काही वाक्य सांगतो - "मला --असा नवरा नको." हे वाक्य चूक आहे. "मला-- असा पती हवा. " हे बरोबर वाक्य आहे.
"मला परीक्षेत नापास करु नकोस." हे वाक्य चूक आहे. " मला परीक्षेत पास करा, चांगले यश दे. " हे योग्य वाक्य आहे.