विश्वमनाला कळणारी भाषा

विश्वमनाला विश्वातील सर्व भाषा कळतात. त्याला सर्व मानवी समूहाच्याच नव्हे तर, पशुपक्षी, वृक्षवल्ली, चल, अचल व आमच्या दृष्टीने सजिव, निर्जीव या सर्वांमधून प्रकट होणाऱ्या भावना विश्वमनाला कळतात. कारण त्याला कळणारी भाषा ही भावना व स्पंदनाची बनलेली आहे. जगातील कुठल्याही भाषेत प्रार्थना केली तरी तो प्रतिसाद देतो, कारण तुमची प्रार्थना जेव्हा अंतर्मनातून विश्वमनात शिरते तेव्हा तिचे रुपांतर भावना व स्पंदनात होते व ती स्पंदने साऱ्या विश्वमनात पसरतात व योग्य त्या व्यक्तींच्या अंतर्मनात उतरून त्यांच्याकडून तुम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळवून देतात.