माझी प्रार्थना

गेली ३५ वर्षे अध्यात्मविज्ञानाच्या सततच्या अभ्यासाने आलेले अनुभव ते येण्यामागची कारणे, त्यांचे पृथक्करण व त्यातून तयार होत गेलेले अध्यात्म विज्ञानाचे निखळ नियम याच्या सखोल मंथनातून जे जाणले त्यातील जे शब्दातून व्यक्त करता आले ते थेंबभर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अमृताचा थेंब आहे व ज्यांना ऐहिक जीवनात यश हवे आहे त्यांच्याकरता हा थेंब पुरेसा आहे. या थेंबाचा आपण आस्वाद घ्यावा व आपणास अमृताचा आनंदी-अनंत सागर असणाऱ्या परमेश्वराकडे जाण्याची इच्छा व्हावी अशीच मी परमेश्वराला विनंती करेन.

परमेश्वराला जाणण्यासाठी त्याच्याबद्दलची जाण म्हणजे स्मरण पक्के होण्याला महत्त्व दिले जाते. कोणी सर्वस्वाचा त्याग करून फक्त परमेश्वर चिंतनाने ही जाण पक्की करतात तर काही जण हे परमेश्वराने दिलेले जीवन आनंदाने त्याचे स्मरण ठेवून कृतज्ञतापूर्वक उपभोगून त्याची जाण म्हणजेच स्मरण मनात बिंबवतात. या दुसऱ्या प्रकरणात येणाऱ्या किंवा येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रार्थनेचे शास्त्र सांगितले आहे.

हे शास्त्र तुम्हाला सकारात्मक तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता प्रदान करेल. बहुतेक वेळेला आपण परमेश्वराला प्रार्थना करतो त्यात आपल्याला नक्की काय हवे हे सांगितलेलेच नसते व इतर चांगल्या वाक्यांचा पण ज्याला फापट-पसारा म्हणता येईल असाच सारा प्रकार असतो. `देवा मला यश दे' असे लोक म्हणतात पण यश म्हणजे नक्की त्याचे स्वरूप काय असावे हे कधीच स्पष्ट करीत नाहीत. `माझे काम होऊ दे !' अशा प्रार्थनेने काम कसे होणार कारण तुमचे नक्की काय काम आहे हे तुम्ही स्पष्ट केलेलेच नसते. कारण हे सर्व हुडकण्याचे काम परमेश्वरानेच करायचे आहे असेच लोकांना वाटते कारण जर त्यांना स्पष्ट बोलण्याबद्दल सांगितले तर `त्यात स्पष्ट काय सांगायचे, परमेश्वराला सगळे माहितच असते' असे उत्तर येते.

या दुसऱ्या प्रकारात येणाऱ्या किंवा येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रार्थनेचे शास्त्र सांगितले आहे.
हे शास्त्र तुम्हाला सकारात्मक तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता प्रदान करेल. बहुतेक वेळेला आपण परमेश्वराला प्रार्थना करतो त्यात आपल्याला नक्की काय हवे आहे ते सांगितलेलेच नसते व इतर चांगल्या वाक्यांचा पण ज्याला फाफटपसारा म्हणता येईल असाच सारा प्रकार असतो. `देवा मला यश दे' असे लोक म्हणतात परंतु यश म्हणजे नक्की काय? त्याचे स्वरूप काय असावे हे कधीच स्पष्ट करीत नाहीत. `माझे काम होऊ दे!' अशा प्रार्थनेने काम कसे होणार? कारण तुमचे नक्की काय काम हे तुम्ही स्पष्ट केलेलेच नसते. हे सर्व हुडकण्याचे काम परमेश्वरानेच करायचे आहे असेच लोकांना वाटते. जर त्यांना स्पष्ट बोलण्या बद्दल सांगितले तर `त्यात स्पष्ट काय सांगायचे, परमेश्वराला सगळे माहितच असते' असे उत्तर येते. जर सगळे त्याला माहिती आहे तर मग त्याने दिले आहे त्यातच समाधानी असले पाहिजे. परंतु जे आहे त्याबद्दल एकतर ते कमी आहे किंवा जसे हवे तसे नाही किंवा माझी आवड निराळी आहे अशीच बहुतेकांची परिस्थिती असते. म्हणूनच प्रार्थना स्पष्ट हवी. आपले मोठे ध्येय काय आहे ते त्यात असावेच पण आत्ताची गरज काय आहे हे ही त्यात स्पष्ट व्हावे. अनेकांच्या बाबतीत तर अशी परिस्थिती असते की त्यांना नक्की काय हवे तेच माहिती नसते. म्हणूनच हे विज्ञान सांगताना प्रार्थना लिहून काढावयास सांगितली आहे. नुसते बोलल्यास प्रार्थनेतील अनावश्यक भाग किंवा तर्कहीन भाग लक्षात येत नाही परंतु लिहून मग वाचले की त्यातले दोष किंवा अनावश्यक भाग लक्षात येतात.
अनेक वेळा लोक मला भेटल्यावर अथवा फोन, पत्र किंवा ई-मेल द्वारे सांगतात की, मी तुम्हाला मागच्या वेळेस भेटलो होतो तेव्हा जी इच्छा माझ्या मनांत घोळत होती किंवा बोलून दाखवली होती ती पूर्ण झाली किंवा होण्याच्या मार्गावर आहे. ते या घडणाऱ्या गोष्टीला चमत्कार समजत असतात परंतु मी त्यांना तो चमत्कार नस़ून अध्यात्म विज्ञानाचा अविष्कार असल्याचे समजावून सांगतो. अनेक धर्मग्रंथ, साधुसंतांची चरित्रे, धर्मसंस्थापकांची चरित्रे तुम्ही वाचली तर त्यांतही तुम्हाला असेच घडलेले वाचावयास मिळेल. सतत अनेकांच्या प्रार्थना स्वीकारून व अनेकांसाठी प्रार्थना करून त्या साधुसंतांचे व धर्मसंस्थापकांचे मन विश्वमनाच्या सतत संपर्कात रहाण्यामुळे त्यांचे मन व विश्वमन यात वेगळेपणाच रहात नाही. जे मन सतत विश्वमनाच्या संपर्कात असते त्या मनाची चुंबकीय शक्ती (मॅगनेटीक पॉवर) अमर्याद प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या मनातील इच्छा ते स्वीकारते व विश्वमनात सोडते व जर तुम्ही प्रत्यक्ष बोलून दाखविल्या तर ऐकल्याने त्या मनात जातात व मनातून अंतर्मनात व तेथून विश्वमनात जातात. इच्छा तुमच्या मनातून विश्वमनात पोहोचली की संतांच्या मनातून विश्वमनात पोहोचली याला महत्त्व नसून ती विश्वमनात पोहोचणे हे महत्त्वाचे आहे. अध्यात्मिकदृष्टया प्रगत असणाऱ्या सर्व धर्मातील साधू, संत व महात्मे यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांच्याच बाबतीत असे घडत असते. परंतू आपणास अध्यात्म विज्ञनाचे नियम माहिती नसल्यामुळे आपण त्याची गणना चमत्कारात करतो. अर्थात आपले मन विश्वमनाच्या सतत संपर्कात ठेऊन त्याचे विश्वमनामधे कायमचे रुपांतर करणे ही कृती सहज साध्य नसून त्याला असामान्य दर्जाचे मनोबल लागते हे ही आपण लक्षात घेतलेच पहिजे. म्हणूनच या पुस्तकात सांगितलेले प्रार्थनेचे शास्त्र तुम्ही आत्मसात कराल तेव्हा तुम्हाला आनंद होईलच परंतु आपली इच्छा असल्यास आपणही श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराज सेवा व उपासना प्रतिष्ठान जे अनेकविध उपक्रम राबवितात त्यात सहभागी होऊ शकता. या प्रार्थनेच्या विज्ञानाने तुम्हाला मिळणारा आनंद, यश व सकारात्मक दृष्टीकोन इत्यादी बाबतचे निरनिराळे अनुभव तुम्ही मला कळविल्यास त्यात सहभागी होण्यास मलाही आवडेल.
ही माझी प्रार्थना म्हणजेच प्रस्तावना वाचताना तुम्हाला जे प्रश्न पडतील त्या सर्वांची उत्तरे सविस्तर पुढे दिलेली आहेत. अर्थातच हे प्रार्थनेचे शास्त्र अध्यात्म विज्ञानाची सुरूवात आहे. या शास्त्राचा आपण जसा-जसा आभ्यास कराल अनुभव घ्याल तशी-तशी पुढील अध्यात्म विज्ञान जाणण्याची तुमची उर्मी नक्कीच वाढेल.
हे प्रार्थनेचे शास्त्र तुम्हाला सर्व प्रश्नांवर मात करण्याची व जीवनातील सर्व क्षेत्रे पादाक्रांत करण्याची शक्ती प्रदान करो हीच परमेश्वराला प्रार्थना!